🕒 1 min read
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात म्हाडाच्या विविध पदांकरिता परीक्षा आयोजित केली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awahad) यांनी मध्यरात्री ऑनलाईन पध्दतीने परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. परंतु हजारो विद्यार्थी बसेही बंद असताना प्रवास करत परीक्षा केंद्रावर उपस्थित आहेत. शासन ठरवून विद्यार्थ्यांचे आर्थिक, शैक्षणिक आणि मानसिक नुकसान करत आहे का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना निर्माण झालेला आहे. यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ताजे आहे, तोच पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार रविवारी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह 6 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. परिणामी, म्हाडाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
या सर्व गोष्टी जनता गांभीर्याने घेत नाही. त्या वेळेपुरते चिडायचे, रागावायचे आणि निवडणुकांना मतदान भलत्याच विषयांवर केले जाते. निवडणुकांच्यावेळी सगळ्याच गोष्टी विसरल्या जातात. नको त्या विषयांवर मतदान करणार असाल तर तुमचा राग कधी व्यक्त करणार? या लोकांना शिक्षा होईपर्यंत हे सुधारणार नाहीत. कारण यांना माहित आहे लोक दोन दिवसात विसरुण जाणार. त्यामुळे परिस्थिती सुधारत नाही. लोकांनी पाच वर्षात जो त्रास सहन केलेला असतो तो ते विसरून जातात. आपल्या देशात लोकसभेची निवडणूक कांद्याच्या भावावर होत असेल तर काही होऊ शकते, असे राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
- आरटीई कायद्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश करा; शिक्षक संघटनेकडून मागणी!
- आकाश चोप्राने निवडला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ; विराट कोहलीला दिला डच्चू
- ‘तेव्हा तुमचे 2 खासदार सायकलवरुन संसदेत जात होते ते विसरलात काय?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
