Share

आरटीई कायद्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश करा; शिक्षक संघटनेकडून मागणी!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आरटीई कायद्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा उल्लेख नाही. याचा अर्थ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कमी करावे असा होत नाही. असा सूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटना महामंडळाच्या राज्य कार्यकारिणी सभेतून निघाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळाची राज्य कार्यकारीणी सभा व्ही. एन. पाटील लॉ कॉलेज एन-३ सिडको औरंगाबाद येथे रविवारी (दि.१२) शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या कार्यकारीणी सभेत अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी एस.पी. जवळकर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे यासाठी प्रयत्न करायला हवे. शिक्षकेत्तर कर्मचारी हा मुख्य घटक आहे. त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाच्या वतीने प्रयत्न केले जाईलच. असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी वाल्मिक सुरासे यांनी देखील मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. यावेळी महामंडळ कार्याचा आढावा घेण्यात आला.  शासन निर्णय २८ जानेवारी २०१९, ७ मार्च २०१९ व ११ डिसेंबर २०२० शिक्षकेतर कर्मचारी या शासन निर्णयाची चर्चा केली. याशिवाय तसेच शिक्षकेतर कर्मचारी कालबध्द पदोन्नती २४ व १०, २० आणि ३० आश्वासित प्रगती योजना सध्यस्थिती बाबत माहीती व चर्चा केली. जिल्ह्यातील संघटना बळकट करण्यावर देखील चर्चा करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!