🕒 1 min read
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) या वर्षीचा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) या संघात समावेश केलेला नाही. या संघाचा कर्णधार म्हणून त्याने केन विल्यमसनची (Kane Williamson) निवड केली आहे.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ही टीम निवडली. सलामीवीर म्हणून त्याने भारताचा रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने याची निवड केली आहे. तसेच त्याने दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचे खूप कौतुकही केले आहे.
यानंतर आकाश चोप्राने तिसऱ्या क्रमांकावर जो रूटची निवड केली आहे, ज्याने इंग्लंडसाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची चौथ्या क्रमांकावर निवड करण्यात आली असून त्याला या संघाचा कर्णधार बनवले आहे.
आकाश चोप्राने पाकिस्तानच्या फवाद आलमचीही निवड केली आहे. त्याने पाकिस्तानसाठी सर्वात वेगवान पाच शतकांचा विक्रम केला आहे. त्याने अवघ्या 22व्या डावात आपले पाचवे शतक झळकावले.
ऑस्ट्रेलियामध्ये ऋषभ पंतची कामगिरी पाहून आकाश चोप्राने त्याची या संघाचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. पंतने यावर्षी 41.52 च्या प्रभावी सरासरीने 706 धावा केल्या आहेत.
यानंतर आकाश चोप्राने न्यूझीलंडच्या काईल जेमिसनची निवड केली असून अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या दोन फिरकी गोलंदाजांचीही निवड केली आहे. त्याचबरोबर त्याने आणखी दोन वेगवान गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसन आणि शाहीन शाह आफ्रिदीची निवड केली आहे.
आकाश चोप्राचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ पुढीलप्रमाणे :
रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, जो रूट, केन विल्यमसन (क), फवाद आलम, ऋषभ पंत (विकेटकीपर), काइल जेमिसन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जेम्स अँडरसन आणि शाहीन शाह आफ्रिदी.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- ‘मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत का?’
- दिल्लीत तक्रार दाखल झाल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले,’मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
