Share

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा! लखनऊला पोहोचताच म्हणाले…

Published On: 

लखनऊ : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 11.30 वाजता ते लखनऊ विमानतळावर पोहोचले. जिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. आदित्य ठाकरे लखनऊ वरुन अयोध्येला जाणार आहेत. यावेळी त्यांनी लखनऊला माध्यमांशी संवाद साधला.

अयोध्येत ते रामललाचे दर्शन घेऊन आरती आणि पूजा करतील. आदित्य ठाकरे म्हणाले, “2018 मध्ये आम्ही पहिल्यांदा इथे आलो तेव्हा आधी मंदिर, मग सरकार असे म्हटले होते. मी येथे प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे! ही जमीन राजकीय नाही. ही रामराज्याची भूमी आहे. अयोध्या ही भारताच्या श्रद्धेशी निगडित आहे आणि इथेही आमची श्रद्धा आहे. आम्ही येथे येत राहतो आणि राम मंदिर बांधल्यानंतर आम्ही येथे केवळ प्रार्थना करण्यासाठी आलो आहोत.”

पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आले होते. महाराष्ट्रातील शिवसेना सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीय अयोध्येला गेले होते.

यापूर्वी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जूनला अयोध्या दौऱ्याचा प्रस्ताव होता, पण अखेर तो रद्द करण्यात आला. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून मोठा विरोध झाला होता. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा राज ठाकरेंना राजकीय इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!