मुंबई : शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना अयोध्येला पाठवून राजकीय डाव खेळला आहे. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेचे अनेक नेते अयोध्येत पोहोचले आहेत. ते सुमारे 6 तास अयोध्येत राहणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत आधीच अयोध्येत हजर आहेत. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातून दौऱ्याला विरोध झाल्यानंतर राज ठाकरेंनी दौरा स्थिगित केला. त्यामुळे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “वंदनीय बाळासाहेबांची हिंदुत्वाची परंपरा आदित्य ठाकरे यांनी कायम राखली. नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वंयघोषित हिंदुजननायकांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा?”
यापूर्वी देखील दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर अयोध्या दौऱ्यावरुन निशाणा साधला होता. “सभा घ्यायच्याच असतील, तर अयोध्येमध्ये घेऊन दाखवा. पुण्यामध्ये तर सिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून”, असे ट्वीट दिपाली सय्यद यांनी केलं होतं.
वंदनीय बाळासाहेबांची हिंदुत्वाची परंपरा आदित्य साहेब ठाकरे यांनी कायम राखली. नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वंयघोषित हिंदुजननायकांनी अयोध्येत दिसु नये हिच श्रीरामांची इच्छा?@ShivSena #jayshreeram???? #Maharashtra
— Deepali Sayed (@deepalisayed) June 15, 2022
आधी मंदिर मग सरकार
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी अयोध्येला जाताना लखनौ विमानतळावर पोहोचले, तिथे शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. विमानतळावर माध्यमांशी आदित्य ठाकरे म्हणाले, 2018 मध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा येथे आलो तेव्हा आम्ही आधी मंदिर मग सरकार असा नारा दिला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

