Share

भारतासाठी १३ टी-२० सामन्यात ईशान किशनने केली ‘ही’ जबरदस्त कामगिरी, मोडला गौतम गंभीरचा विक्रम

Published On: 

मुंबई : भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या सामन्याच्या पहिल्या डावात २० षटकात ५ बाद १७९ धावा केल्या होत्या. संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात रुतुराज गायकवाडच्या ५७ धावा आणि इशान किशनच्या ५४ धावांचा मोलाचा वाटा होता. इशान किशनचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे टी-२० मधले पहिले अर्धशतक होते. तर क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे त्याचे चौथे अर्धशतक होते. किशनचा हा १३वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने १३ डावात ४५३ धावा करत गौतम गंभीरचा विक्रम मोडला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये इशान किशनने १३ सामन्यांच्या १३ डावात ३७.७५ च्या सरासरीने ४५३ धावा केल्या आहेत. आता तो भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या १३ डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिस-या क्रमांकावर आला आहे. त्याने गौतम गंभीरचा विक्रम मोडला आहे. गंभीरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या पहिल्या १३ डावात ४१५ धावा केल्या होत्या. गंभीर इशान किशनच्या पुढे तिसऱ्या स्थानावर होता. किशनने आता गंभीरला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे.

भारतासाठी टी-२० क्रिकेटच्या पहिल्या १३ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत केएल राहुल पहिल्या क्रमांकावर आहे, राहुलने ५०० धावा केल्या आहेत, तर विराट कोहली ४६१ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. किशन आता ४५३ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतासाठी गंभीर ४१५ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. युवराज सिंग ३९० धावांसह पाचव्या तर रोहित शर्मा ३२० धावांसह सहाव्या स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ डावांनंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टॉप ६ फलंदाज-

५०० धावा – केएल राहुल
४६१ धावा – विराट कोहली
४५३ धावा – इशान किशन
४१५ धावा – गौतम गंभीर
३९० धावा – युवराज सिंग
३२० धावा – रोहित शर्मा

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!