Share

एमएस धोनी म्हणतोय ! “मी माझ्या जिल्ह्यासाठी आणि शाळेसाठी क्रिकेट खेळलो नसतो तर…”

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीने जिल्हा क्रिकेटवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटपटूंनी आपापल्या जिल्ह्यांकडून खेळण्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असं तो म्हणाला आहे. धोनीच्या म्हणण्यानुसार, जर तो जिल्हा किंवा शालेय क्रिकेटचा भाग नसता तर तो कधीच या टप्प्यावर पोहोचला नसता. एमएस धोनीने चेन्नईतील तिरुवल्लूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रमात बोलताना सांगितले, या कार्यक्रमासाठी धोनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. त्यांच्यासोबत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासनही उपस्थित होते.

क्रिकेटपटूंनी आपल्या जिल्ह्यासाठी खेळण्याचा अभिमान बाळगावा

महेंद्रसिंग धोनीने कोणत्याही क्रिकेटपटूच्या यशासाठी जिल्हा क्रिकेट अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वर्णन केले. तो म्हणाला, “जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सेलिब्रेशनमध्ये मी भाग घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मला बोलवले त्याबद्दल रांची येथील जिल्हा क्रिकेट संघटनेचेही आभार मानू इच्छितो. क्रिकेटपटूंनी आपल्या जिल्ह्यासाठी खेळण्याचा अभिमान बाळगला पाहिजे. मला माझ्या देशासाठी खेळण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे, पण जर मी माझ्या जिल्ह्यासाठी किंवा शाळेसाठी क्रिकेट खेळलो नसतो तर इथपर्यंत पोहचणे कधीच शक्य झाले नसते.

महत्त्वाचं म्हणजे, एमएस धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारताला एकदिवसीय विश्वचषक, विश्व टी-२० आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवून दिलेला आहे . २०१६ मध्ये धोनीने सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषाविण्याचा विक्रम केला होता. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्याने चेन्नई संघाला अनेक वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. याशिवाय एमएस धोनीच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड्स आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!