🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनामुळे औरंगाबाद येथे दरवर्षी सकाळी नऊ वाजता होणारा शासकीय कार्यक्रम आज सकाळी सात वाजताच घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हैदराबादला अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असल्याने या कार्यक्रमाच्या वेळेत बदल केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. याचपाश्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुलं पत्र लिहून निशाणा साधला आहे.
राज ठाकरे संतापलेः
रझाकारांसोबतच सजाकारांचाही उल्लेख करत खोचक टीका या पत्रातून राज ठाकरे यांनी केली आहे. संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाही तर आधुनिक सजाकारही येऊन बसले असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.
पाहा ट्विटः
हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तर #मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे!#MarathwadaMuktiSangram pic.twitter.com/T7qnjdH3FS
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2022
मनसे या दोघांचा बंदोबस्त करेलचः
गेले कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे सहजाकर अर्थात लवकरच मनसे या दोघांचा बंदोबस्त करेलच, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या या पत्रात लिहिलं आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम विषयी फारसं बोललं का जात नसेल? असा प्रश्न विचारत अर्थातच रझाकारांचा लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं, असे उत्तर देखील राज ठाकरे यांनी दिल आहे. त्यामुळे असं होणं स्वाभाविक असलं तरी सध्या याच रझाकारांची पुढची अवलाद मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते आणि दुर्दैव असं की माझी माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी या पत्रातून एमआयएमला अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केल्याचं म्हटलं जात आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Happy Birthday Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती किती? जाणून घ्या एका क्लिकवर
- Maharashtra Rains | राज्यात परतीच्या पावसाने घातला धुडघूस.. आजही ऑरेंज अलर्ट..
- Devendra Fadnavis | महाराष्ट्र पुढील दोन वर्षांत गुजरातच्या पुढे जाईल – देवेंद्र फडणवीस
- Gulabrao Patil | “अजित पवार आम्हाला गद्दार म्हणाले ते आम्हाला मान्य, पण…”, गुलाबराव पाटील
- Health Tips | फास्ट फूडचे शौकीन आहात,तर सावधान! कारण फास्ट फूड करते तुमच्या आरोग्यावर परिणाम..जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
