🕒 1 min read
मुंबई – राज्यात कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज साठ हजारांच्या जवळ कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील मोठ्या प्रमाणार तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड झाला आहे.
रेमडीसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली असताना सुध्दा उपलब्ध होत नाही.नेमका काळाबाजार कसा होतोय किंवा काय कारवाई सरकार करतेय याबाबत कोणतीही स्पष्टता होवू शकत नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर आल्याने नातेवाईकांची होत असलेली वणवण आणि लूटमार थांबविण्यासाठी शासनानेच कडक पावले उचलावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनकरता लांबच्या लांब रांगा लावत आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा आणि रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा, अशी मागणी आता नातेवाईक करत आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आ.विनायक मेटे यांनी आज आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरून राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीरची चढ्या दरात विक्री केली जात आहे. रेमडेसिवीर बाबत मला अनेक रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन, मेसेजस येत आहेत. सोशलमिडियावरही रेमडेसिवीर हवे आहे यासाठी रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात विनवण्याच्या पोस्ट करत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा राज्यात खरचं तुटवडा आहे की जाणिवपूर्वक तुटवडा निर्माण केला जातोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सोबतच राज्यसरकारने तात्काळ चौकशी करावी आणि खरचं तुटवडा असेल तर रेमडेसिवीर जिल्हास्तरावर उपलब्ध करून काळाबाजार रोखावा अशी विनंती देखील केली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा राज्यात खरचं तुटवडा आहे की जाणिवपूर्वक तुटवडा निर्माण केला जातोय? याची राज्यसरकारने तात्काळ चौकशी करावी आणि खरचं तुटवडा असेल तर रेमडेसिवीर जिल्हास्तरावर उपलब्ध करून काळाबाजार रोखावा ही विनंती. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @rajeshtope11
— Remembering Vinayak Mete (@vinayakmete) April 10, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’
- ‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं’
- रेमडेसिव्हिर इंजेक्शन काय आमच्या घरी तयार होत नाही : छगन भुजबळ
- गडकरींचा धडाका : नागपुरकरांना मिळणार तब्बल 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स
- छत्रपती उदयनराजे यांचे ‘कटोरा’ घेत लॉकडाऊन विरोधात आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

