Share

महाराष्ट्राला जेवढी गरज असेल तेवढ्या लसी पुरवण्याचं जावडेकरांचं आश्वासन : अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. कोरोना लसीकरणावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. महाराष्ट्रातील जनतेला या कठीण काळात सुरु असलेले हे हीन दर्जाचे राजकारण उघड्या डोळ्यांनी पाहत बसावे लागत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे. आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पुण्याचे महापौरांसह अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणची आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. प्रकाश जावडेकरांनी जेवढी व्हॅक्सिनची गरज असेल, तेवढ्या व्हॅक्सिन केंद्राकडून देण्याचा निर्णय घेतलेला असल्याचं सांगितल आहे.’ व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेडवर जास्त लक्ष द्यावे लागेल. ससूनमध्ये 500 बेड्स देण्याचं नियोजन आहे. संचारबंदीला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोनाची साखळी तोडणं आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यानं एकमेकांवर टोलवाटोलवी न करता एकमेकांना सहकार्य करावं,’ असे आवाहन यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!