मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.
यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात केंद्र सरकारने तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे. असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. तर जर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले याचा तपशील पण कळला पाहिजे. अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशी फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील. असा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे. तर जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी. अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रांनी चौकशी केली तर फटक्यांची माळ लागेल, राज ठाकरेंचे गंभीर आरोप
- जिल्हा बँक निवडणुकीला गालबोट; भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

