Share

मराठवाड्यात पावसाचा धुमाकुळ, जायकवाडी ९२ टक्के भरले, ११ वाजता दरवाजे उघडणार

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सलग सात दिवस अतिवृष्टी झाली आहे. २५ लाख हेक्टरवरील पिकांचे ७ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. खरीपाचा तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जायकवाडी धरणातही ९२ टक्के साठा झाला असून ९६ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. अशीच आवक सुरु राहिल्यास हे धरण काही मिनीटात १०० टक्के भरु शकते, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण पैठणला जाण्यास निघाले असून ११ वाजता धरणातून विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदीलगतच्या गावांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.

११ वाजता जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडणार

उत्तर महाराष्ट्रात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने जायकवाडी धरणात आवक वाढली आहे. सकाळी ९ वाजता धरणात ९२ टक्के पाणीसाठा होता. आवक वाढल्याने पाणीसाठा वाढतच चालला आहे. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता धरणातून विसर्ग सुरु केला जाणार आहे. त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.

मराठवाड्यात सलग सात दिवस अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीलगतच्या जमिनी खरडून गेल्या असून शेतात चोहीकडे पाणीच पाणी साचल्याले दिसून येत आहे. मराठवाड्यातील जवळपास ७ लाख शेतकऱ्यांचे २५ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. जायकवाडी धरणक्षेत्रात मराठवाड्यातील मोठा भाग येतो. मराठवाड्यात पाऊस सुरुच असल्याने या धरण क्षेत्रातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत त्यातच धरणातून पाणी सोडल्यास या नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. आज दुपारनंतर धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम

उत्तर महाराष्ट्रातही सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्याने नाशिक जिल्ह्यातीतून वाहनाऱ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या नद्यांना महापूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावे आणि ग्रामस्थांना स्थलांतराच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. गोदा घाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!