Share

मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच; सहस्त्रकुंड धबधब्याने केले रौद्ररूप धारण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच आहे. नांदेड, परभणी, हिंगाेली, जालना, लातूर आदी जिल्ह्यांत पावसाने चांगलेच झोडपून काढले. परभणी व नांदेडमध्ये शेतात पाणी साचल्याने पिकांचे बरेच नुकसान झाले आहे. तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा गेट उघडण्यात आले. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत. जालना जिल्ह्यात १५ मंडळांत अतिवृष्टी झाली. यामुळे ठिकठिकाणी सोयाबीन, कापूस, मका, मिरची आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. उस्मानाबादेत गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात मध्यम ते हलक्या सरी बरसल्या.

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ६.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. दुपारी बारापर्यंत पावसाचा हलका शिडकावा सुरू होता. त्यानंतर पाऊस थांबला होता.

‘निम्न दुधना’चे बारा दरवाजे उघडले
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा ८४ टक्यांपेक्षा अधिक झाल्याने १२ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे दुधना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्याचा फटका दुधनालगत असलेल्या गावांना बसला आहे. परभणी-जिंतूर रस्त्यावरील करपरा नदीस बोरी गावाजवळ मोठा पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पालम तालुक्यातील १२ ते १४ गावांचा संपर्क तुटला होता.

विष्णुपुरीचे सहा दरवाजे खुले
नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे आज उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हा प्रकल्प याआधीच भरला असून पाण्याची आवक वाढताच विसर्ग केला जातो. नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे.यामुळे पर्यटकांना भुरळ घालणारा सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केलं आहे. गेल्या दोन दिवसापासून किनवट, हदगाव, हिमायतनगरसह पैनगंगा नदीच्या पट्ट्यात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ईस्लामपुर येथील धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!