🕒 1 min read
औरंगाबाद : घाटीच्या वस्तीगृहात जवळपास ४०० ते ५०० विद्यार्थी राहत असून या विद्यार्थ्यांना कुठल्याच सोयीसुविधा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार समस्या मांडून देखील त्या दूर होत नसल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पदवीपूर्व मुलांच्या वस्तीगृहाची अतिशय दुरावस्था झाल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
जून महिन्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण होते. मात्र जुलै महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग दोन ते तीन तास पडलेल्या पावसामुळे येथील वस्तीगृहातील खोल्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. आणि हळू-हळू खोल्यामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली. हा संपूर्ण प्रकार रात्री घडला त्यामुळे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली. संपूर्ण खोल्यांमध्ये पाणी शिरल्याने अंथरूण-पांघरूणासह संपूर्ण वैयक्तिक सामान पावसाच्या पाण्यात भिजले. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर वेगळ्या समस्या आ वासून उभ्या आहेत.
विद्यार्थ्यांनी याबाबत वस्तीगृह प्रशासनास वारंवार पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये संपूर्ण वस्तीगृहामध्ये वॉटरप्रूफिंग करण्यात यावी. अशी मागणी देखील विद्यार्थ्यांकडून यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी संपूर्ण वस्तीगृहात शिरून विद्यार्थ्यांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर वस्तीग्रह वॉटरप्रूफिंग करण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंतरवासिता संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. जगदिश धोटे सह आदींच्या वतीने करण्यात आली. अन्यथा विद्यार्थ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई द्या – भाजप
- भविष्यात कोरोना संसर्गापासून बचावासाठी काळजी घ्या, आमदार निलंगेकरांनी केले सांत्वन
- SBI ने ऑनलाइन फ्रॉडपासून वाचण्यासाठी योनो लाइट अॅपमध्ये आणले नवीन फिचर
- ‘सर्व विरोधक एकत्रित आल्यास सहा महिन्यातच परिणाम दिसतील’ – ममता बॅनर्जी
- प्रलंबित ॲट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास त्वरित करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
