🕒 1 min read
कागल -राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली आहे. गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. या महापुरात शेतीचे आणि शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महापूर व अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी.या मागणीचे निवेदन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिले. गेल्या आठवड्यामध्ये कागल तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामध्ये दुधगंगा, वेदगंगा व चिकोत्रा या नद्यांच्या काठा शेजारील क्षेत्रातील ऊस, भात, भुईमुग, सोयाबीन आदी पिके महापुराच्या पाण्याखाली बुडाली आहेत. त्यामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अचानक उद्भवलेल्या या पुर परिस्थितीमुळे मोटरपंप व मोटर पेठया पाण्यात बुडुन खराब झाल्याने सुद्धा शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
अनेक घरांमध्ये महापुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन शेतकरी व नागरिकांना त्वरीत नुकसान भरपाई मिळणेबाबत कार्यवाही व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील उपाध्यक्ष नंदू माळकर तालुकाध्यक्ष संजय पाटील शहराध्यक्ष सुशांत कालेकर विवेक कुलकर्णी राजेंद्र जाधव प्रविण गुरव, दीपक मगर ,युवराज पसारे गजानन माने, हिदायत नाईकवाडी सचिन निंबाळकर बाळासाहेब जाधव अरुण गुरव आदि उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नाही; ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे’
- नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल
- गुजरात कॅडरचे IPS अधिकारी राकेश अस्थाना दिल्लीचे नवे पोलीस कमिशनर
- केंद्राकडून पूरग्रस्तांना ७०१ कोटींचा निधी, सदाभाऊ खोत यांनी मानले मोदींचे आभार
- नदीपात्रातील व ओढ्यावरील अवैध बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देवू नका – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
