🕒 1 min read
लातूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक कुटुंबातील सदस्यांना आपले जीव गमवावे लागले. कुटुंबातील सदस्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या अचवला येथील ग्रामप्रंचायत सदस्य स्वरा पाटे, विळेगांव येथील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजित बेळकोणे यांचे बंधु व आईचे कोरोनामूळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांत्वन केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी घरातील व्यक्ती गमावले आहेत. या पुढील काळातही कोरोना संसर्गापासून बजावासाठी सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार निलंगेकर यांनी म्हटले आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबियांच्या घरातील व्यक्तींसाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासनही आमदार निलंगेकर यांनी दिले आहे.
भविष्यात जर मुला-मुलींच्या शिक्षणासाठी किंवा कुटुंबाला काही अडचण असेल तर आपण परिवारासोबत राहणार असल्याचे आमदार निलंगेकर यांनी म्हटले. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष काशिनाथ गरिबे, हावगीराव पाटील, सविता पाटील आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेगॅससमधून होणारी हेरगिरी म्हणजे देशद्रोहच’; राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- ‘दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- धोनीचा शिलेदार पुणेकर ऋतुराज आज करु शकतो आंतरराष्ट्रीय पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
