Share

‘सर्व विरोधक एकत्रित आल्यास सहा महिन्यातच परिणाम दिसतील’ – ममता बॅनर्जी

Published On: 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या विधानसभेत मोदींना धूळ चारून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी या कालपासून दिल्ली दोऱ्यावर आहेत. त्यांनी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. दिल्लीत येऊन राजकीय पक्षांच्या भेटीगाठी घेत असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्ताधारी भाजपवर वार करण्यास सुरुवात केली आहे.

आज माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि, संसदेतही काम होत नाही. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे, अशी घणाघाती टीका करतानाच सर्व विरोधक एकत्रित आल्यास सहा महिन्यातच चांगले परिणाम दिसतील, असा सूचक इशाराच ममता बॅनर्जी यांनी आज दिला आहे.

तसेच यावर पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘माझा फोनही हॅक करण्यात आला होता. अभिषेक आणि राजनीतीकार प्रशांत किशोर यांचा फोनही हॅक करण्यात आला होता. फ्रिडम ऑफ प्रेसही उरलेलं नाही, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. पेगासस हा एक खतरनाक व्हायरस आहे. त्यामुळे आमच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे. संसदेचं काम सुरू नाही. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. सध्या तरी आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती आहे,’ अशी घाघाती टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी यांनी, ‘सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यायला हवं. आम्ही सर्व एकत्र बसू व यातून मार्ग काढू.’ असं बॅनर्जी यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी त्यांना, विरोधी पक्षांचं नेतृत्व कोण करेल असा प्रश्न विचारला असता, ‘याबाबत सांगायला मी काही ज्योतिषी नाही. कोणीतरी पुढे येईल, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.’ असं सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!