🕒 1 min read
मुंबई : सध्या लोकांमध्ये डिजिटल व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनाच्या काळापासून अनेक लोक अधिक करून डिजिटल बँकिंगचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक बँक आपल्या ग्राहकांना याचा अधिक उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच यासाठी सुरक्षित व्यवहार होणे देखील मह्त्त्वाचे आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया वेळोवेळी आपल्या ग्राह्नाकांना सावध राहण्यासाठी सतर्कतेचा इशारा देत असते. त्यामुळे आता एसबीआयचे ऑनलाइन बँकिंग आता अधिक सुरक्षित होण्यासाठी YONO Lite app चे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड केल्यास यात एक नवीन सिक्योरिटी फीचर देण्यात आले आहे.
ग्राहकांना ऑनलाइन फ्रॉडपासून वाचण्यासाठी एसबीआय योनो लाइट हे अॅप अपग्रेड केलं आहे. या नवीन सिक्योरिटी फीचरच्या माध्यमातून तुमच्या एसबीआय योनो अकाउंटला दुसरं कुणी दुसऱ्या फोनमधून अॅक्सेस करु शकणारा नाही. त्यामुळे तुम्ही सुरक्षित रित्या ओनलाईन बँकिंग करू शकता.
महत्वाचे म्हणजे SBI ऑनलाइन बँकिंगसाठी YONO चा वापर करताना बँक खात्यामध्ये रजिस्टर्ड असलेल्या मोबाइलवरुनच तुम्हाला हे नवं सिक्योरिटी फीचर वापरता येऊ शकते. कोणत्याही अन्य मोबाइल क्रमांकावरुन याचा वापर तुम्हाला करता येणार नाही. काही दिवसा पूर्वीच योनो अॅपचे पुढील व्हर्जन घेऊन येत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेगॅससमधून होणारी हेरगिरी म्हणजे देशद्रोहच’; राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- ‘दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- धोनीचा शिलेदार पुणेकर ऋतुराज आज करु शकतो आंतरराष्ट्रीय पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
