🕒 1 min read
पुणे: राज्यात गेले काही दिवस विश्रांती घेतेलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. सध्याची या स्थितीमुळे पुढील काही दिवस दक्षिण कोकणातील काही भागासह घाट परिसर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीने महाराष्ट्रासाठी 26-30 ऑगस्टसाठी हवामान चेतावणी जारी केली आहे. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता. मुसळधार पावसाचा इशारा D4, D5 काही ठिकाणी
Severe weather warnings by IMD for 26-30 Aug for Maharashtra
For details pl see IMD Websites @RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/JcCfDA140x— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 26, 2021
नुकतेच आयएमडीने महाराष्ट्रासाठी 26-30 ऑगस्टसाठी हवामान चेतावणी जारी केली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केली केला. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून पुण्यात देखील पावसानं उघडीप घेतली असल्याचे पहायला मिळाले. गेले काही दिवस पाऊस नसल्याने पुण्यात काही प्रमाणात तापमान देखील वाढले होते. यामुळे हवामानात बदल जाणवला होता. परंतु काल पासून पुण्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंना दणका; ईडीने केली ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
- ‘अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांना स्वीकारले; मला नाही’, महिला खासदाराची नाराजी’
- शिवेसनेबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही; राजन साळवी यांचा इशारा
- योद्धा पुन्हा मैदानात…राणेंची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार
- ‘राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचे बक्षीस’, विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षांचे वादग्रस्त विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
