औरंगाबाद : सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला पावसाने झोडपले आहे. या वर्षी झालेल्या पावसामुळे सुमारे ३ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर सुमारे ३० लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात अंतिम अहवाल शासन स्तरावर तयार करण्याचे काम सुरू आहे.
मराठवाड्यामध्ये वास्तविक कमी पाऊस पडतो. यंदा मात्र, सरासरीपेक्षा १५० टक्के जास्तीचा पाऊस झाला आहे. याचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीपोटी इथल्या शेतकऱ्यांना १७९६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यात शेतकरी सरसकट मदत करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
त्यातच या पुढील काळात परतीचा पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. या पावसाचाही शेतकऱ्यांना फटका बसेल. या सर्वांमुळे शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. सरकारमधील मंत्री आणि आमदार देखील मदत करण्याची मागणी करत आहेत. मात्र, राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- मिरज दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं
- आयपीएलमध्ये फक्त पन्नास रुपये गुंतवून सलूनवाला रातोरात झाला करोडपती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

