नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशातील नागरिकांशी संवेदनशील साधला होता. देशातील कोरोनाची परिस्थिती, अंतिम वर्षांबाबतच्या परिक्षांचा लांबलेला निर्णय, JEE NEET या परिक्षांसंदर्भात असलेले गोंधळाचे वातावरण आणि वाढती बेरोजगार यावर देशातील तरुणाई नाराज होती. जेव्हा मोदींनी मन की बात कार्यक्रमात संवाद साधला तेव्हा त्या व्हिडीओवर तरुणाईने डिस्लाईकचा पाऊस पाडला.
आता मोदींच्या अशाच एका व्हिडीओलासुद्धा तरुणाई डिस्लाईक केलं जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएस ईंडीया स्ट्रेटीजिक पार्टनरशिप फोरमच्या लिडरशीप समिटला संबोधित करत होते. त्यांच्या या भाषणावर हजारोंच्या संख्येने डिस्लाईकचा पाऊस पडला. मोदींनी या आपल्याला भाषणात आपला देश कशा पद्धतीने कोरोनाला सामोरे जात आहे.
याबद्दल भाष्य केलं, सार्वजनिक आरोग्याचा विचार करून कोरोनाचा सामना करण्यासाठी मास्कचा वापर करावा, तोंड झाकावं असं अवाहन करणारा भारत पहिला देश होता. जानेवारीत देशात केवळ एक टेस्टींग लँब होती. ति संख्या आता 1600 च्या घरात गेली आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. या व्हिडीओचं प्रसारण पंतप्रधान कार्यालयाच्या व भारतीय जनता पक्षाच्या यूट्यूब चँनलवरुन केल गेले होतं.
हा व्हिडीओ 14 तासात 3 लाख 24 हजार लोकांनी पाहीला तर 10 हजार लोकांनी लाईक्स केले आहेत आणि 91 हजार लोकांनी डिस्लाईक केलंय. त्यातील एकूण 19 हजार कमेंट्समधून बहुतांश कमेंट्स या तरुणांच्या असून त्यांनी बेरोजगारबद्दल संताप व्यक्त केला आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घेतल्या जाणाऱ्या परिक्षांसंदर्भातसुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या -:
नगर शहरात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी; शहरातील रस्ते झाले जलमय…
सहा वर्षांपूर्वी झालेल्या महामार्गवर जिवघेणे खड्डे, वसूल होतोय अव्वाच्यासव्वा टोल, मनसे आक्रमक
‘किसी के बाप में हिम्मत है तो रोख ले’ ; कंगनाच टीकाकारांना खुलं आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

