Share

नगर शहरात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी; शहरातील रस्ते झाले जलमय…

Published On: 

अहमदनगर: यावर्षी पावसाने सुरुवाती पासूनच राज्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भाला पुराचा तडाखा बसला. तसेच पिक ऐन जोमात असताना जास्त पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

गुरुवारी नगर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी झालेल्या या पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये बागरोजा हडको, दिल्लीगेट, यासह अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले होते. रस्त्यांवरून मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी वाहिल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये दुकानांच्या बाहेर लावलेल्या वाहने तर काही ठिकाणी ड्रम्स वाहून जात होते.

यावेळी महानगरपालिकेच्या वतीने तात्काळ आपत्कालीन यंत्रणा द्वारे मदतकार्य सुरू करण्यात आले. सर्व ठिकाणी मदत यंत्रणा पोहचविण्यात येत आहे. या अतिवृष्टीमुळे शहरालगत असलेल्या सीना नदीला पूर आला आहे. यावेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. तर आधीच कारोना रूग्ण संख्येत वाढ होत असताना शहराला पावसाने झोडपल्याने ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरी समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या -:

‘किसी के बाप में हिम्मत है तो रोख ले’ ; कंगनाच टीकाकारांना खुलं आव्हान

हार्दिक पटेलांचा भाजपला “दे धक्का”; 40 भाजप समर्थकांचा काँग्रेसध्ये प्रवेश

धारावी व कोळीवाडाच्या धर्तीवर ‘आमचे’ शहर होणार कोरोनामुक्त, गृहमंत्र्यांचा निश्चिय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!