मौदा : नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील असंख्य लहान मोठे खड्डे वाहन चालकांच्या जीवावर बेतू शकतात. सध्या येथून जाताना प्रत्येकालाच तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे केवळ ६ वर्षांपूर्वी हा महामार्ग पूर्ण झाला असून, सुरुवातीला सगळे आलबेल होते. मात्र, मागील ६ महिन्यांपासून या मार्गाची दुर्दशा इतकी वाईट झाली की, वाहन चालवावे तरी कसे हा प्रश्न पडतो.
उन्हाळ्यात या रस्त्याची योग्य देखभाल दुरूस्ती न केल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट झाली असली तरी वाहन चालकांकडून हक्काने टोल वसुली तर होतेच.
‘किसी के बाप में हिम्मत है तो रोख ले’ ; कंगनाच टीकाकारांना खुलं आव्हान
रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात रात्री अपरात्री येथे जिवघेणे अपघात होत आहेत. दुर्दैवाने मात्र याकडे रस्ते प्राधिकरणाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. रस्त्यावर होत असलेल्या अपघातांना जवाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. हे खड्डे ८ दिवसांत न बुजविल्यास मनसेने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात टोल नाका बंद करण्याचा ईशारा दिलेला आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मौदा-कामठी अध्यक्ष बंडू वैरागडे यांनी उपविभागीय अधिकारी मौदा श्याम मदनुकर यांना संदर्भातले निवेदन दिले.
हार्दिक पटेलांचा भाजपला “दे धक्का”; 40 भाजप समर्थकांचा काँग्रेसध्ये प्रवेश


