Share

‘किसी के बाप में हिम्मत है तो रोख ले’ ; कंगनाच टीकाकारांना खुलं आव्हान

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवरच संशय घेत आरोप केले . तर, “मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशा आशयाचे ट्विट केले होते. दरम्यान, मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे,” असे ट्विट अभिनेत्री कंगनाने केल्यानंतर आता तिला चांगलेच लक्ष्य केले जात आहे.

कंगनाच्या या वक्तव्यावर मराठी चित्रपटसृष्टीसह राज्यातील सामान्य नागरिक देखील संताप व्यक्त करत असून अनेक राजकीय नेत्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. हे प्रकरण आता तापले असून कंगना रणौतने आणखी एक ट्विट करत खुले आव्हान दिले आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत पाऊल ठेऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिने या ट्विट द्वारे टीकाकारांसह संजय राऊत यांनाच अप्रत्यक्षपणे आव्हान दिल्याच्या चर्चा रंगु लागल्या आहेत.

पुरोगामी विचाराचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बार्शीत अंधश्रद्धेची स्तोम…

तिने, “मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्याच्या ९ तारखेला मी येणार असून मुंबईमध्ये लँड होण्याची वेळ देखील मी पोस्ट करेन, कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.” असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस हे कंगणा आणि राम कदमांचे बोलवते धनी,कदमांची नार्को चाचणी करा:सचिन सावंत

दरम्यान, अमेय खोपकर यांनी, “माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही” असा फोटो ट्विट केला आहे.

धारावी व कोळीवाडाच्या धर्तीवर ‘आमचे’ शहर होणार कोरोनामुक्त, गृहमंत्र्यांचा निश्चिय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!