औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी पेरणी केली आहे. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेल्या कोवळ्या पिकांना जगवायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे सतत तापमान वाढत असल्याने अनेकांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. गंगापूर तालुक्यात ८४ हजार ९४१ हेक्टर म्हणजेच ७९.३५ टक्के पेरणी झाली आहे. २८ जून रोजी तालुक्यात पाऊस झाला. त्यानंतर आजतागायत पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस, बाजरी, तूर, सोयाबीन, मका, व मूग यांची पेरणी केली जाते. जून महिन्यापासून पेरणीस प्रारंभ होतो. त्यामुळे जुलै महिना असला तरीही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यात जुलै महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरीही अजूनही हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पावसाळा आहे असे वाटतच नाही. तापमानात वाढ झाल्याने तीव्र उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या उघडीपमुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये कामगारांच्या हाताला काम नव्हते. पावसाळा सुरू झाल्याने त्यांना कामे मिळू लागली होती. मात्र पावसाअभावी पेरणी थांबल्याने मजुरांच्या हातांना काम मिळणे अवघड होऊन बसले आहे. मृग नक्षत्रातील पेरणीचे दिवस निघून गेले आहेत. मृग नक्षत्रात होणारा पाऊस पेरणी पिकासाठी फायद्याचा असतो. मृग नक्षत्रामध्ये कडधान्यांची पेरणी केली जाते. त्यांना मृग नक्षत्रात कडधान्यांची पेरणी झाली नाही. त्यामुळे यंदा डाळींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात जवळपास ८० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ ; प्रकाश जावडेकरांनी सुद्धा दिला राजीनामा
- कोरोनाच्या दोन लाटेमधील काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा – उद्धव ठाकरे
- कोरोना परिस्थिती हाताळण्यात हर्षवर्धन यांना अपयश आल्यानेच त्यांचा राजीनामा घेण्यात आला ?
- मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपचा ‘हा’ नेता झाला भावूक , म्हणाला …
- राज्यातील ग्रामीण भागात पुन्हा शाळांची घंटा वाजणार; वर्षा गायकवाड यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
