मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार थोड्याच वेळात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यापूर्वीच आतापर्यंत 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच मोदी मंत्रिमंडळात 43 नव्या मंत्र्ंयांचा समावेश होणार आहे. पण एकामागून एक मंत्री राजीनामे देत असल्याने नव्या विस्तारात कुणाला संधी मिळणार यापेक्षा कोण मंत्री घरी गेलं याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
दिल्लीत आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 7 रेसकोर्स हे निवासस्थान या राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं आहे. ज्या संभाव्य नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यांच्याशी मोदींनी आज संवाद साधला. सरकारची कामे, देशाची आणि राज्यांची परिस्थिती, आव्हाने आणि नव्या मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा याबाबत मोदींनी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दोन लाटेमधील काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा – उद्धव ठाकरे
- औरंगाबादेत उरला केवळ ५०० लसींचा साठा, लसीकरण पुन्हा ठप्प होणार!
- भाजपमध्ये पक्ष सदस्य होण्यापूर्वी आयारामांना मंत्रीपदाची संधी? चाकणकरांची टीका
- अखेर विद्यापीठातील बीकॉमच्या विद्यार्थ्यांना मिळणार न्याय, दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश!
- कृपाशंकर सिंह कोण आहेत ? त्यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी खरंच लाभदायक ठरेल का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

