Share

औरंगाबादेत रेल्वे संपत्तीची चोरी करणारी टोळी अखेर गजाआड; आरपीएफची कारवाई!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गेल्या तीन महिन्यांपूर्वी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर असलेले ट्रान्स्फाॅर्मरमधील १७३ किलो कॉपर चोरट्यांनी पळविले होते. शहरातील अनेक भागांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सीसीटीव्हीच्या निगराणीत असलेल्या रेल्वे स्टेशनमध्येच चोरी सारख्या घटना घडल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत होता. रेल्वेची संपत्ती चोरी करणारी ही टोळी अखेर आरपीएफने आता पकडली आहे.

तीन महिन्यांपूर्वी रेल्वे इलेक्ट्रिक ऑफिसमधील ट्रान्सफॉर्मरमधील एकूण १ लाख ३ हजार ८०० रुपये किंमतीचे १७३ किलो कॉपर चोरट्यांनी पळविले होते. त्या चोरट्यांना पकडण्यास आरपीएफला यश आले आहे.  चितेगाव, रमागाव या ठिकाणी चार आरोपी सापडले असून त्यांना आरपीएफने ताब्यात घेतले आहे. त्यात जितेंद्र संतोषसिंग टाक (वय-३२ वर्ष, रा.अलाना, गेवराई तांडा चितेगाव औरंगाबाद)  तसेच सुरजित परमसिंग भोंड (वय-१९ वर्ष रा. अलाना,गेवराई तांडा चितेगाव औरंगाबाद), मजहर अली अझिझुल्ला खान (वय-३२ वर्ष, रा. साजापुर वाळूज औरंगाबाद) आणि  सय्यद रईस सय्यद युसुफ (वय-४५ वर्ष, रा. संजयनगर लेन.न. १३/बी बायाजीपुरा औंगाबाद) या चार चोरांचा समावेश आहे.

रेल्वेची संपत्ती चोरल्याच्या आरोपात या चार पैकी पैकी ३ आरोपींना आरपीएफ औरंगाबाद यांनी गुन्हा नोंदवून अटक केली. त्यांच्याकडून संपूर्ण चोरी केलेला माल जप्त केला आहे. यासाठी आरपीएफ निरीक्षक परमविर सिंग, पीएसआय के. चंदुलाल, पीएसआय विजय वाघ, हेड कॉन्स्टेबल तेजराव वानखेडे, हेड कॉन्स्टेबल सुनिल नलवाडे,  हेड कॉन्स्टेबल यू. आर. दोभाल, हेड कॉन्स्टेबल सानप यांनी शोध घेतला. लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद होत्या. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी झाल्याने रेल्वे देखील रुळावर आल्या. त्यामुळे प्रवाशी संख्या देखील वाढली आहे.  त्यातच आता चोरांचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!