मुंबई – मुंबईकरांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी आणि महिलांसाठी विशेष सेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
राज्यसरकारने महिलांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर रेल्वेने नियमित सेवा सुरू केली नाही. ज्यामुळे महिला प्रवाशांना सुविधा मिळत नाहीय. एकीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल हे रेल्वे सेवा सुरू करण्यास तयार आहे मात्र राज्यसरकारने परवानगी दिली नाही सांगत आहेत परंतु राज्य सरकारने आता परवानगी देवून सेवा का दिली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केंद्रसरकार यामध्ये राजकारण करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. रेल्वेने नियमित सेवा सुरू करा… जादा गाड्या सुरू करा… गर्दी होवू नये यासाठी अतिरिक्त सेवा सुरू करा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- कोंबडा आरवला नाही तरी सकाळ व्हायची थांबत नाही,नवाब मलिक यांची जोरदार टीका
- ‘अजितदादांनीच आता शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी’
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- जाणून घ्या पुणे विभागातील कोरोनाची नेमकी काय आहे स्थिती ?
- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची त्वरित नियुक्ती करा-भाजपा महिला मोर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

