Share

 जाणून घ्या पुणे विभागातील कोरोनाची नेमकी काय आहे स्थिती ?

Published On: 

पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 37 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 86 हजार 388 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 128 इतकी आहे. कोरोनाबाधित एकुण 13 हजार 276 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.05 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा-
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 14 हजार 462 रुग्णांपैकी 2 लाख 86 हजार 737 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 20 हजार 387 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 338 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.18 टक्के आहे.

सातारा जिल्हा-
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 511 रुग्णांपैकी 36 हजार 582 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 499 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा-
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 181 रुग्णांपैकी 32 हजार 492 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 353 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा-
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 858 रुग्णांपैकी 38 हजार 545 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 737 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा-
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 376 रुग्णांपैकी 43 हजार 628 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 152 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 596 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 461 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 817, सातारा जिल्ह्यात 278, सोलापूर जिल्ह्यात 154, सांगली जिल्ह्यात 126 तर कोल्हापूर जिल्ह्यात 86 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 3 हजार 46 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 830, सातारा जिल्हयामध्ये 185, सोलापूर जिल्हयामध्ये 283, सांगली जिल्हयामध्ये 429 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 319 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
18 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार,आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 19 हजार 967 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 86 हजार 388 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!