औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणाला वडोदबाजार पोलिसांनी सुरत येथून ताब्यात घेत शनिवारी अटक केली. रविंद्र उर्फ राजेंद्र दत्तु वाघ (२२ नायगव्हाण ता. फुलंब्री) असे आरोपीचे नाव आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी दिले.
या प्रकरणात अल्पवयीन पीडितेच्या वडीलांनी फिर्याद दिली. त्यानूसार २४ जानेवारीला आरोपीने पीडितेला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. तक्रारीवरुन वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. गुन्ह्याचा तपास सुरु असताना १६ एप्रिल रोजी पोलिसांनी आरोपीच्या मित्राची चौकशी केली. आरोपी हा पीडितेला सुरत (गुजरात) घेवून गेला. तेथेच ते दोघे राहत असल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी सुरतहून दोघांना ताब्यात घेतले. महिला दक्षता समितीने पीडितेचा जबाब घेतल्यानंतर आरोपीने तिला फुस लावून पळवून नेले व बलात्कार करुन पीडितेला गर्भवती करण्यास कारणीभूत ठरल्याचे देखील समोर आले.
आरोपीला अटक करुन शनिवारी न्यायालयात हजर केले. सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे आहे. आरोपीचे कपडे जप्त करणे, आरोपीने पीडितेला गुजरात येथे कोण कोणत्या ठिकाणी नेउन बलात्कार केला याचा तपास करणे आहे. आरोपीचे कोणी साथीदार आहेत काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

