चेन्नई : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा १३ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय असुन गुणतालीकेत पहिल्या स्थानावर मुंबईने झेप घेतली आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाचा हा सलग तिसरा पराभव झाला असुन ते गुणतालीकेत सर्वात शेवटच्या म्हणजे आठव्य स्थानी आहे.
या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित आणि डिकॉकने संघाला अर्धशतकी सलामी दिली. यात रोहितने बाद होण्यापुर्वी २५ चेंडुत २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३२ धावांची खेळी केली. या दरम्यान रोहितने २ षटकार मारत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. रोहितच्या नावे आता २१७ षटकार आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडुंच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत स्फोटक फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. गेलच्या नावे ३५१ षटकार आहेत. तर दुसऱ्या स्थानी एबी डिव्हिलियर्स असून त्याच्या नावे २३७ षटकार आहेत.
या विक्रमासह रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नावावर २१६ षटकार आहेत. या यादीत धोनी नंतर विराट कोहली तिसऱ्या, सुरेश रैना चौथ्या आणि रॉबिन उथप्पा पाचव्या स्थानी आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा महेंद्रसिंह धोनी या आयपीएल स्पर्धेत अद्याप खातेही उघडू शकला नाही. पहिल्या सामन्यात शुन्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात धोनी फलंदाजीसाठी मैदानावर येण्याआधी चेन्नईचा संघ विजयी झाला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज –
१) रोहित शर्मा – २१७
२) एमएस धोनी – २१६
३) विराट कोहली – २०१
४) सुरेश रैना – १९८
५) रॉबिन उथप्पा – १६३
आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –
१) ख्रिस गेल – ३५१
२) एबी डिव्हिलियर्स – २३७
३) रोहित शर्मा – २१७
महत्वाच्या बातम्या
- …तर मुंबईत कर्नाटकातील लोकांना व्यापार-उद्योग चालवणे कठीण होईल; राऊतांचा ‘रोखठोक’ इशारा
- ऑरेंज आर्मीची पराभवाची हॅटट्रिक; मुंबई विरुद्ध १३ धावांनी स्विकारावा लागला पराभव
- औरंगाबादेत बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक, सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी
- लातूर महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी ४ हजार रूपयांची मदत
- हेल्पलाईनच्या माध्यमातून रूग्णांना बेड मिळवुन देण्याचे नियोजन करावे : पालकमंत्री

