नवी दिल्ली: मागील वर्षापासून तीन कृषी कायदे करण्यासाठी शेतकरी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मात्र आज सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच यावेळी मोदींनी देशाची माफीही मागीतली आहे.
कायद्याच्या ज्या तरतूदीवर त्यांचा आक्षेप होता. तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे सस्पेंड करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो की आमच्या तपस्येत काही कमी पडली असेल. आता आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.
देश के अन्नदाता ने सत्याग्रह से अहंकार का सर झुका दिया।
अन्याय के खिलाफ़ ये जीत मुबारक हो!जय हिंद, जय हिंद का किसान!#FarmersProtest https://t.co/enrWm6f3Sq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2021
या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली आहे. यावर आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली आहे. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय किसान!’, असे म्हणत शेतकऱ्यांच्या लढ्याला मिळालेल्या यशाचे अभिनंदन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शिवसेनेच्या भ्रमाचा भोपळा २०१७ मध्येच फुटला’, फडणवीसांचे टीकास्त्र
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना अंतरिम दिलासा; २ डिसें.पर्यंत कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश
- ‘भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी’, संजय राऊतांचा हल्लाबोल
- ‘ओ..घुंगरू सेठ…तुम्ही किंमत चुकवलीये थेट’, चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
- लड़ने को तुम और भाषण को हम- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

