🕒 1 min read
नवी दिल्ली: एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (MIM MP Asaduddin Owaisi Attacked)) यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशातील मेरठजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या गाडीवर एकूण चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये असाऊद्दीन ओवेसींना कोणतीही हानी झाली नसून ते सुखरुप असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.
मेरठवरुन परत येत असताना आपल्या गाडीवर चार राऊंड फायर झाल्याचा दावा खासदार असाऊद्दीन ओवेसींनी केला आहे. त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली आणि आपण दुसऱ्या गाडीच्या मदतीने त्या ठिकाणाहून निघाल्याची माहिती असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे. या घटनेबाबतची माहिती असदुद्दीन ओवेसी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे.
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
मेरठ पोलीस अधिक्षकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी भेट दिली असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटनेचे अनेकजण साक्षीदार आहेत, त्यामुळे आता यूपी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्पियाज अली यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘कॉंग्रेसला मत म्हणजे…’; अरविंद केजरीवालांची कॉंग्रेसवर टीका
-
पुष्पाची क्रेझ काही थांबेना! मराठमोळा अभिनेता प्रशांत दामलेचा अल्लू अर्जुन स्टाइल व्हिडीओ, एकदा पहाच
-
जनतेशी नाळ असलेला नेता, चोपदारच्या लेक-जावयाची केली विचारपूस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
