🕒 1 min read
नवी दिल्ली – दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत काँग्रेस पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. कॉंग्रेसच्या या जाहीरनाम्याला ‘जन आवाज’ असे नाव देण्यात आले आहे. हम निभाएंगे’ असे म्हणत काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला.
राहुल गांधींनी घोषणा केली की, आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडू. ज्याप्रमाणे रेल्वेसाठी वेगळे अंदाजपत्रक आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांठीही असेल. त्यांच्यावर किती पैसे खर्च होत आहे हे शेतकऱ्यांनाही कळेल. तसेच शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास क्रिमिनल ऑफेन्स नसेल तर सिव्हील ऑफेन्स असेल, अशीही घोषणा राहुल गांधीनी जाहीरनाम्यात केली आहे.
Delhi: Congress party releases their election manifesto for #LokSabhaElections2019 pic.twitter.com/fccNKOuSqZ
— ANI (@ANI) April 2, 2019
यावेळी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. या जाहीरमान्यात रोजगाराचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला, मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.


