हाथरस : उत्तर प्रदेशमधील हाथरस गावात एका तरुणीसोबत झालेल्या घटनेने देश हादरला आहे. या पीडितेचा मंगळवारी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात असून देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली जात आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेससह समाजवादी पार्टी देखील आक्रमक झाल्याचे आज सकाळपासून दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये तणावाची स्थिती निर्माण होत असून हाथरस भागात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे निदर्शकांना हद्दीबाहेरच रोखण्यात आले असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तर, काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांच्यासह हाथरस गाठले आहे. त्यामुळे तिथे प्रचंड गदारोळ माजला असून कार्यकर्ते व पोलीस यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राहुल गांधी हे कुटुंबियांना भेटण्यावर ठाम असून ते पायीच निघाले. त्यावेळी त्यांची अडवणूक करताना पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली आहे.
यानंतर, राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं असलं तरी पोलीस देखील त्यांना रोखण्यावर ठाम आहेत. राहुल गांधी यांनी या महामारी काळात नियम झुगारून असं वर्तन केल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकतात. अजूनही राहुल गांधी पुढेच जाणार मागे हटणार नाही अशा भूमिकेत असल्याने पोलिसांनी अखेर त्यांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- राज्य सरकारच्या अडचणी वाढणार; 10 तारखेला महाराष्ट्र बंद ठेवण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
- नियम मोडल्याने स्टार खेळाडूवर कारवाई? चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन म्हणतं ‘ते’ वृत्त खोटं
- भाजपचे झुंजार नेते नारायण राणेही अडकले कोरोनाच्या विळख्यात!
- बार-हॉटेल्स सुरु होणार मग मंदीरं बंद का? राणा जगजितसिंह पाटील यांचा थेट सवाल
- धक्कादायक; रात्रीच्या अंधारात अज्ञातांनी पेटवली कांदाची चाळ


