Share

धक्कादायक : रात्रीच्या अंधारात अज्ञातांनी पेटवली कांद्याची चाळ

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरत असतानाच पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील शेतकरी नारायण केरु बरकडे यांची कांद्याची चाळ एका अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधारात पेटवून दिल्याने त्यांचे साडेचार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

चोंभूत येथील या शेतकऱ्याने चार रुपये होतील या आशेने कांदा राखून ठेवला होता. या मनोवृत्तीचा परिसरातून निषेध होत असून गुन्हेगाराला तातडीने पकडून त्याला कडक शिक्षा करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

लॉकडाउनमध्ये विक्री रखडलेल्या कांद्याला आता उच्चांकी भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. मध्यंतरी निर्यातबंदी झाल्याने अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीतही चोंभूत येथील शेतकरी नारायण केरु बरकडे यांनी भाववाढीच्या आशेपोटी कांदा राखून ठेवला होता. अज्ञातांनी त्यांच्या कांदाचाळीला आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वसाधारणपणे या कांदाचाळीत ३०० गोण्या कांदा होता. त्यामुळे चोंभूत परिसरातील शेतकऱ्यांकडून अशा वृत्तीचा निषेध होत आहे.

शेतकरी नारायण बरकडे यांनी तीन दिवसांपूर्वीच हा कांदा व्यापाऱ्याला साडेचार लाखांना दिला होता. मात्र हातात पैसे पडण्याआधीच अज्ञातांनी कांदाचाळ पेटून दिल्याने बरकडे यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी विकास गायकवाड यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली. घडलेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!