मुंबई : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात थैमान घातला आहे. राज्यात सद्या कोरोनामुक्तांचा आकडा समाधानकारक असला तरी रुग्णवाढ आटोक्यात येणे गरजेचे आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्री, स्थानिक लोकप्राधिनिधी यांच्यापासून ते अनेक बॉलिवूड स्टार्सना कोरोनाने विळखा घातल्याचे दिसून आले होते.
आता भाजपचे खासदार आणि नेते नारायण राणे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे ट्विटरद्वारे सांगितले आहे. “माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.” असं त्यांनी सांगितलं आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) October 1, 2020
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे यांनी कोरोनावर मात केली होती. महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी नारायण राणेंसह निलेश राणे व आमदार नितेश राणे यांनी चांगलीच रणनीती आखल्याचे दिसून आले होते. त्यांनी अनेक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं होतं. तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आदित्य ठाकरे आमचा साधा फोनही उचलत नाही, अबू आझमींचा घणाघात
- ‘पंतप्रधानांना हाथरसप्रकरणी दु:ख झाले असेल तर योगींचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करावं’
- प्रत्येक गावाचा पीक आराखडा लवकरात लवकर तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- दिवाळीच्या धमाक्यासोबतच खिलाडी कुमारचा ‘लक्ष्मी बॉम’
- हाथरस प्रकरणातील आरोपींना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा व्हावी – पवार


