Share

नियम मोडल्याने स्टार खेळाडूवर कारवाई? चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन म्हणतं ‘ते’ वृत्त खोटं

Published On: 

दुबई : यंदा कोरोनाच्या सावटातुन मार्ग काढत नुकत्याच सुरुवात झालेल्या आयपीएलला खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण लागले आहे. अशातच काही वैयक्तिक कारणामुळे चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला माघार घ्यावी लागली होती. तर दुसरा स्टार खेळाडू आणि फिरकीपटू हरभजन सिंग देखील यंदाच्या आयपीएल मोसमात सामील झालेला नाही.

तर, सुरुवातीच्याच सामन्यात उत्तर कामगिरी करणारा आणि लयीत असलेला फलंदाज अंबाती रायडूला काही सामन्यांना मुकावं लागलं आहे. तो लवकरच पदार्पण करेल असे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळालेल्या चाहत्यांना आता आणखी एक धक्का बसला आहे.

या सीझनच्या आयोजनासाठी आयपीएलमध्ये सहभागी होणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांना बायो बबलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आयपीएलच्या आयोजनासाठी बायो बबलचे नियम अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. तसेच बायो बबलचे नियम तोडणाऱ्यांसाठी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला होता. आता बायो बबलचा फटका सीएसकेचा वेगवान गोलंदाज एम. आसिफला बसला आहे. एम. आसिफने आयपीएलचा बायो बबलचे नियम मोडला आहे, असे वृत्त व्हायरल झालं आहे.

आसिफ हा नियम मोडणारा पहिला खेळाडू ठरला असून त्याला बायो बबल तोडण्यासाठी 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे. इतकंच नाही तर आसिफने या सीझनमध्ये पुन्हा एकदा चूक केली तर मात्रा त्याला आपल्या चुकीची शिक्षा म्हणून आयपीएलच्या 13व्या सीझनमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. दरम्यान, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी हे वृत्त चुकीचं असून कोणत्याही खेळाडूने बायो बबलचे नियम तोडले नसल्याचं सांगितलं आहे.

असिफच्या रूमची चावी हरवली होती, मात्र त्याने यावेळी रिसेप्शनला जाऊन नियम मोडल्याचे वृत्त चुकीचं आहे. या खेळाडूने नियम न तोडता अशी परिस्थिती उद्भवल्यास मदत करण्यासाठी जे नेमले आहेत त्यांच्याशी संपर्क साधल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हे वृत्त चेन्नई संघाने धुडकावून लावले असल्याने नेमकं खरं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!