तुळजापूर – देशातील इतर राज्यातील मंदीरे धार्मिक स्थळे उघडे असताना महाराष्ट्रातील बंद का? असा सवाल करुन महाराष्ट्र सरकारने लवकर मंदीरे भाविकांसाठी खुले न केल्यास राज्यपालांकडे धाव घेणार वेळ प्रसंगी मंदीरे खुले करण्यासाठी न्यायालयात ही दाद मागणार अशी माहीती माजीमंञी तथा आमदार तथा श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त राणा जगजितसिंह पाटील यांनी पञकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुले करावेत या बाबतीत आयोजित पञकार परिषदेत पुढे बोलताना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले , महाराष्ट्र सरकारने दारु विक्री सुरु केली आता बार हाँटेल सुरु करतय मग मंदीर का उघडत नाही ? असा सवाल उपस्थित केला. या पुर्वी आम्ही धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन केले पण आता ते करणे योग्य वाटत नाही .त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या पुर्वी मंदीर दहा दिवसात खुले करण्या बाबतीत जे भाष्य केले होते ते बोलणे आततरी खरे करुन दाखवावे असे आवाहन केले
देशातील वैष्णोवदेवी तिरुपती बालाजी सह अनेक मंदीर खुले असुन भाविक दर्शन घेत आहेत माञ शिवरायांच्या महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत. महाराष्ट्रात मंदीरे खुले नसल्यामुळे धार्मिक स्थळांमधील मंदीरावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न आज गंभीर बनला आहे.
महाराष्ट्र शासनाने नियम अटी शर्ती घालुन मंदीरे खुले करण्यासाठी परवानगी द्यावी आपण सांगाल ते नियम अटी शर्ती पाळण्यास विश्वस्त तयार आहेत. शासनाने मंदीरे खुले करण्याचे नियोजन पुर्वीच करायाला हवे होते आता नवराञोत्सवात तरी मंदीरे खुले करावेत असे शासनाला आवाहन केले.दरम्यान, राज्यपाल नंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाने परिक्षा घेणार नसल्याचे पुन्हा घेतल्या व त्या निर्विघ्नपणे पार पडल्या असे स्पष्ट केले.मंदीर सुरु करताना प्रथमता थोड्या लोकांना प्रवेश द्या. वडीलधारी मंडळी लहान मुले वगळा हळु हळु संखेत वाढ भाविकांची रँपिडअँन्टेजन टेस्ट करुनच मंदीरात प्रवैश द्या मंदीर समित्याही आपण दिलेल्या अटी शर्ती नियम पालन करेल पण मंदीर उघडा असे यावेळी आवाहन केले.
लवकरच श्रीतुळजाभवानी मंदीराचे मुख्य गर्भगृह चांदीचे करुन गर्भगृहात आकर्षक विद्युत यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस असुन हे कामे व तिर्थक्षेञ तुळजापूरातील विकास कामे कोरोना मुळे थांबल्याचे सांगितले. तिर्थक्षेञ तुळजापूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ व शैक्षणिक हब करणार असून त्याचे कामही लवकरच सुरु होईल असे यावेळी स्पष्ट केले.तिर्थक्षेञ तुळजापूर चा विकासासाठी केंद्राकडून ही मोठा प्रमाणात निधीआणण्याचे नियोजन असल्याचे शेवटी म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी विनोद गंगणे नागेश नाईक सुहास सांळुके अदि यावेळी उपस्थितीत होते.
महत्वाच्या बातम्या : –
- मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी अन्यथा ‘मातोश्री’ बाहेर आंदोलन करू; मराठा समाज आक्रमक
- एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा परीक्षा केंद्रचं फोडू; मराठा समितीचा आक्रमक इशारा
- राज्य सरकारच्या अडचणी वाढणार; 10 तारखेला महाराष्ट्र बंद ठेवण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
- नियम मोडल्याने स्टार खेळाडूवर कारवाई? चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन म्हणतं ‘ते’ वृत्त खोटं
- भाजपचे झुंजार नेते नारायण राणेही अडकले कोरोनाच्या विळख्यात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

