🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक राज्यांनी कडक निर्बंध देखील लागू केलेत. पण केंद्र सरकारने राबवत असलेल्या योजनांची प्रसिद्धी देण्याकरिता जाहिराती प्रकाशित केल्यात. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विनंती केली आहे.
‘केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की ‘पीआर’ व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवं. सध्याची परिस्थिती असहनीय आहे’ असे ट्विट राहुल यांनी केलेय.
https://twitter.com/RahulGandhi/status/1385805531907076097
कोरोनामुळे ऑक्सिजनचा स्तर घसरू शकतो. ऑक्सिजनचा तुटवडा आणि आयसीयू बेडची कमतरता यामुळे रुग्ण दगावत आहेत. कोरोनाला आळा घालणे आणि मृत्यू रोखणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे असं देखील राहुल गांधी म्हणाले.
https://twitter.com/RahulGandhi/status/1385446229383987200
देशात कोरोना महामारी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या तयारीवर आक्षेप घेत काँग्रेस गत काही दिवसांपासून आक्रमक झाली आहे. ऑक्सिजनसोबतच लसीच्या तुटवड्यावरुनही यापूर्वी राहुल गांधींनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. तर ऑक्सिजन तुटवडा संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले. त्यापूर्वी मनमोहन सिंग यांनीही पत्राद्वारे केंद्र सरकारला कोरोना संकटाविरोधातील पाच उपाय सुचविले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय! रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- राज्यात लवकरच मोफत लसीकरण ? अजित पवारांनी दिले संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

