मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. आता मी काँग्रेसमध्ये थांबणार नाही व भाजपातही जाणार नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. कॅ. अमरिंदर हे भाजपात जाणार नाहीत, पण बाहेर राहून काँग्रेसचा घात करणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांनी ठरवलेले दिसते.
काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पदे भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱया म्हातार महामंडळाने ‘जी-23’ नावाचा गट स्थापन केला व ते काँग्रेसची अंतर्गत भांडणे चव्हाटय़ावर आणत आहेत. अमरिंदर यांच्या निमित्ताने या म्हातार मंडळाने उचल खाल्ली. राहुल गांधी यांनी जसे या म्हातार महामंडळाच्या झांशात येऊ नये तसे नवज्योत सिद्धूसारख्या येडबंबूच्या नादालाही लागू नये. असा सल्ला संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
काँग्रेस पक्षात जुने भरवशाचे लोक म्हातारचळ लागल्याप्रमाणे वागत आहेत, तर सिद्धूसारख्या लोकांचे चित्त ठिकाणावर नाही. पंजाबातील काँग्रेसचा उरलासुरला पायाही हे येडबंबू खतम करतील. पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. पंजाबातील अशांतता व असंतोषामुळे देशाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. हजारो लोकांचे रक्त त्यात सांडले. भिंद्रनवाले प्रकरण हा काळा अध्याय होता. ते सर्व पर्व संपवून पंजाबने नवा अध्याय सुरू केला. पंजाबात पुन्हा राजकीय अशांतता निर्माण झाली तर अतिरेकी प्रवृत्ती डोके वर काढतील, याचे भान केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठेवण्यातच देशाचे हित आहे. कॅ. अमरिंदर येतील व जातील. त्यांनी सत्तेची सर्व सुखे काँग्रेस पक्षातच भोगली आहेत. आता भोगायला उरले नाही तरीही खुर्चीचा मोह सुटत नाही. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मला अजित दादांना राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसलेलं बघायचंय – अमोल कोल्हे
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- वारी मार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार- अजित पवार
- ‘शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा;त्यांना पुण्यात गुंतवून ठेवू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

