Share

‘त्यांना न्याय मिळायला हवा होता’, एल्गार परिषद प्रकरणातील स्टॅन स्वामींना राहुल गांधींची श्रध्दाजंली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे आज सोमवारी दुपारी दीड वाजता निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणात स्टॅन स्वामी आरोपी होते असून त्यांना ९ ऑक्टोबर २०२० रोजी रांची येथून अटक करण्यात आली होती.

मुंबई हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर २ मे रोजी स्वामींना तळोजा मध्यवर्ती कारागृहातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. नुकत्याच कोरोनामधून बरे झालेल्या स्वामींची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना मुंबईच्या हॉली फॅमिली हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले होते. विशेष म्हणजे स्वामी आणि एल्गार प्रकरणातील त्यांच्या सहकारी आरोपींनी तळोजा कारागृहात आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याच्या वारंवार तक्रारी केल्या आहेत.

आजच्याच दिवशी त्यांच्या जामीनाबाबतच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. यासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलंय की, ते न्याय आणि मानवतेस पात्र होते.

स्वामी यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी त्यांच्या वकिलांनी सोमवारी सकाळी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. कारण रविवारी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. स्वामींना मे महिन्यापासून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने आणि ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने त्यांना रविवारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, स्वामींची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांचे वकील मिहिर देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!