Share

राहुल गांधी ‘अ‍ॅक्सिडेंटल हिंदू’; योगी आदित्यनाथ यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

अमेठी: अनेक राज्यांमध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष शक्ति प्रदर्शने तसेच विरोधी पक्षांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे दिसत आहे. त्याच सोबत अनेक पक्षांचे नेते जाहीर सभा घेत फिरत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये देखील आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे तिथे राजकारण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अमेठी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी भाषण करताना त्यांनी राहुल गांधी तसेच कॉंग्रेस पक्षावर चांगलाच निशाणा साधला असल्याचे बघायला मिळाले.

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महात्मा गांधी हे हिंदू होते तर गोडसे हिंदुत्ववादी होते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या व्यक्तव्यावरुन योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही काहीही लपवलं नाही. आम्हाला कसलीच भिती वाटत नाही. जेव्हा मुख्यमंत्री नव्हतो तेव्हा पण म्हणायचो, आजही म्हणतो आणि पुढेही म्हणत राहील की, गर्व से कहो हम हिंदू है, असं म्हणत योगी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, निवडणूक आल्यानंतर हे लोक हिंदू बनून बाहेर पडतात. यांचे पूर्वजच सांगायचे की आम्ही अ‍ॅक्सिडेंटल हिंदू आहोत. त्यामुळे हे लोक स्वत:ला हिंदू म्हणू शकत नाहीत. मंदिरात कसं बसतात, हे देखील राहुल गांधी यांना माहिती नाही. त्यांनी ज्या मंदिराला भेट दिली, तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना कसं बसतात हे शिकवलं. हिंदुत्व किंवा हिंदुत्ववाद काय आहे, हे त्यांना ठाऊक नाही. तरीही ते चुकीचा प्रचार करत असल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!