🕒 1 min read
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच ओमायक्रॉनचे (Omicron) देखील बरेच रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे. तसेच कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये या साठी निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आता यात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2022
एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भविष्यात भाजप शिवसेनेसोबत…”; खोतकरांच्या बॅनरबाजीवर प्रवीण दरेकरांचे मोठे विधान
- ‘बड़े अच्छे..’ फेम नकुलच्या चिमुकल्यास कोरोनाची लागण
- महत्वाची बातमी! कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवासी कोरोनाबाधित
- अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक नाही
- …त्यामुळे साहजिकच पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारच निर्णय घेणार- अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
