Share

‘बड़े अच्छे..’ फेम नकुलच्या चिमुकल्यास कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. कोविडची प्रकरणे दररोज झपाट्याने समोर येत आहेत. दरम्यान टेलिव्हिजनवरील ‘बड़े अच्छे लगते हैं’ फेम नकुल मेहता कोरोना (Actor Nakuul Mehta ) पॉझिटिव्ह झाल्यानंतर आता त्यांच्या घरातील आणखी एका सदस्याला लागण झाली आहे. नकुलच्या ११ महिन्यांच्या मुलाला कोरोनाची लागण (Covid positive) झाली असून नकुलची पत्नी जानकी पारेख मेहता Janki Parekh यांनी सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली.

नुकतच अभिनेता नकुल मेहता यांची पत्नी जानकी पारेख मेहता यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘मला कुठेतरी वाटत होते की कोरोनासारखा व्हायरस आपल्यापैकी बहुतेकांना लवकर किंवा नंतर पकडेल. माझ्या ११ महिन्यांच्या मुलाला संसर्ग झाल्याच्या बातमीने मला धक्का बसला आहे. तुमच्यापैकी काहींना दोन आठवड्यांपूर्वी माझ्या पतीला कोरोना झाल्याचे कळले. काही दिवसांनी माझ्यामध्येही कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. मला वाटले माझ्या बहिणीच्या लग्नात न येणे हे सर्वात वाईट आहे. पण, कोरोनाने सांगितले की हे यापेक्षा वाईट असू शकते.

https://www.instagram.com/p/CYQWzbELadw/?utm_source=ig_web_copy_link

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांनाही लागण होत असून आता टीव्ही कलाकार नकुल मेहता आणि जानकी पारेख यांचा मुलगा सूफी (son Sufi ) देखील या महामारीच्या विळख्यात आला आहे. नकुलची पत्नी जानकी यांनी सांगितले की, मुलाला मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा ताप १०४ च्या पुढे गेला होता. माझ्या बाळाला आयसीयूमध्ये पाहणे म्हणजे कठीण दिवस होते, मुलांची विशेष काळजी घ्या, असे जानकी म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!