🕒 1 min read
मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता असतानाच २००० हून अधिक प्रवासी कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई-गोवा क्रूझवर (Mumbai-Goa Cruise) अडकले आहेत. त्यापैकी ६६ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे.
दरम्यान सोमवारी अन्य प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे अहवाल येईपर्यंत त्यांनी जहाजावरच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुमारे २००० प्रवासी रविवारी रात्रीपासून क्रूझवर अडकले आहेत. तर गोवा सरकारने क्रूझवरील प्रवाशांना चाचणीशिवाय उतरण्यास नकार दिला आहे.
दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याने कृती दलाची बैठक घेतली. तसेच कोरोना रुग्णवाढीमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांची शारीरिक सत्रे बंद राहतील. असा निर्णय घेण्यात आला आहे. तर आता त्यातच २००० प्रवासी असलेल्या क्रूझवर ६६ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. तर इतर प्रवासांच्या चाचण्यांचे रिपोर्ट अजून यायचे बाकी आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …त्यामुळे साहजिकच पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारच निर्णय घेणार- अतुल भातखळकर
- अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक नाही
- लसीकरणाला मुलांचा प्रतिसाद; पहिल्याच दिवशी गाठला १ लाखाचा टप्पा
- चिंता नको, काळजी घ्या! पुणे महापौरांचे आवाहन
- संजय राऊतांनी शिवसेनेच्या औकातीचे दर्शन देशाला घडविले; भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
