🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे जालन्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यातील संघर्ष येणाऱ्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जालन्यात भावी खासदार या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना भाजप वेगळ्या लढल्या तर हा संघर्ष अटळ असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार म्हणून अलीकडच्या काळात मुख्यमंत्री किंवा शिवसेनेकडून होणारी विधाने बघता भविष्यात भाजपसोबत शिवसेना लढेल असे दिसत नाही. त्यामुळे अर्जुन खोतकर जर भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करुन उमेदवार असल्याचे दर्शवित असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दोन दिवसांपूर्वी आम्ही नवीन मित्र जोडले असल्याचे सांगितले. त्यामुळे जुन्या मित्राशी फारकत असल्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय असू शकतो.”
यावेळी प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “शिवसेनेला पक्ष म्हणून त्याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी पुण्यात अत्यंत चिंताजनक वक्तव्य केलं. ‘पुण्यात शिवसेना संपवायच काम अजून सुरु आहे’. या दृष्टीने मला वाटत हा जरी पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी मला वाटते त्यांनी (शिवसेनेने) काळजी घेण्याची आवश्यकता आहे.”
महत्वाच्या बातम्या –
- महत्वाची बातमी! कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवासी कोरोनाबाधित
- अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक नाही
- …त्यामुळे साहजिकच पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारच निर्णय घेणार- अतुल भातखळकर
- त्यामुळे साहजिकच पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारच निर्णय घेणार- अतुल भातखळकर
- लसीकरणाला मुलांचा प्रतिसाद; पहिल्याच दिवशी गाठला १ लाखाचा टप्पा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
