Share

भाजपकडून संभाजीराजेंचा गैरवापर, आंदोलनात मराठा समाज नव्हे भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग-अशोक चव्हाण

Published On: 

मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेडमधील मराठा मोर्चाला संबोधित करताना काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. ‘राज्यात अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली, तेव्हा त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा ९६ टक्के वाले मराठे आहोत’, अशी टीका त्यांनी केली होती.

यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, ‘संभाजीराजे मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे भाजपमधील एकमेव नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर केलेल्या वैयक्तिक टिकेला मी उत्तर देणार नाही. परंतु, भाजप त्यांचा गैरवापर करते आहे. नांदेडमधील आंदोलन हे भाजपप्रणीत होते, याची कदाचित त्यांना कल्पना नसावी. या आंदोलनासाठी भाजपचे कार्यकर्ते गोळा करण्यात आले होते. बहुतांश मराठा संघटना आजच्या आंदोलनात सहभागी झाल्या नव्हत्या, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

यापूर्वी सगळ्या मुक मोर्चाला लोकप्रतिनिधी आले. नांदेडच्या मुक मोर्चाला इथले बहूतांश आमदार, लोकप्रतिनिधी आले पण नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण आले नाहीत. नांदेडचे सुपूत्र दिल्लीत येतात. सर्वांना भेटतात. पण मला का भेटले नाहीत, अशी माहिती देत खासदार छत्रपती संभाजीराजेंनी अशोक चव्हाणांना टोला लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!