Share

‘राहुल गांधींना ‘हम दो, हमारे दो’ म्हणण्यासाठी आधी लग्न करावं लागेल’

Published On: 

नवी मुंबई : आज नवी मुंबईत रिपाइंचा रिपब्लिकन मेळावा पार पडला. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे रिपाइंचा नवी मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध केल्याच्या मुद्द्यावर राहुल गांधींवर खोचक टीका केली आहे. राहुल गांधी यांनी हम दो हमारे दो अशी टीका केली होती. याला आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘राहुल गांधींना हम दो, हमारे दो म्हणण्यासाठी आधी लग्न करावं लागेल’, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

‘मोदी सरकारने नवे कृषी कायदे अदानी आणि अंबानींसाठी आणल्याची टीका होते. मात्र, ती अत्यंत चुकीची आहे. त्यांना नफा कमवायला अनेक दुसरे उद्योग आहे. त्यांना शेतीवर उद्योग करायचे आहेत असं नाही. राहुल गांधी म्हणतात की ‘हम दो, हमारे दो’. राहुल गांधींना असं म्हणण्यासाठी लग्न करावं लागेल. हम दो, हमारे दो असा आरोप करण्यात काहीही तथ्य नाही. हा कायदा चांगला आहे’, असंही आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!