नागपूर : २०१९ निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत पारित झालेल्या कायद्यात सोडविण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. मग काँग्रेसचा त्याला विरोध का ? राहुल गांधींना त्यांच्याच पक्षाचा जाहीरनामा माहिती नसावा, त्यांनी तो अभ्यासण्याची गरज आहे अशा खोचक सल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
नागपुरात झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी फडणविस म्हणाले, शेतमालाच्या निर्यातीवरील निर्बंन्ध हाटवणार, छोट्या गावात शेतकरी बाजार उघणार, शेतकऱ्याना थेट माल विकण्याची मुभा देणार, देशात कोल्ड स्टोरेजचे जाळे वाढविणार आणि प्रक्रिया उद्योगाची निर्मिती करणार अशा काही घोषणा काँग्रेसने त्यांच्या जाहीर नाम्यात केल्या होत्या.
याच मागण्या पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी संसदेत केले आहे. शिवाय यूपीएच्या सरकारमध्ये शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांच्या अहवालातील त्रुटी सोडविण्याचे काम कृषी विध्येयकाने केलेले आहे. इतकेच नव्हे तर नीती आयोगाच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर हे विध्येयक आहे. त्यामुळे या विधेयकाला जर काँग्रेस विरोध करत असेल तर ते केवळ राजकारण करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काँग्रेसचे शेतकऱ्यांवरचे प्रेम आटले असून हा बेगडीपणा असल्याचे फडणवीस म्हणाले.
कृषी विध्येयकातून मोदी सरकारने शेतकरी हिताचे दोन महत्वाचे कायदे मंजूर केले आहेत. आत्तापर्यंत आत्तापर्यंत कृषी उत्पन्न बाजारपेठेत शेतकऱ्याला माल विकावा लागायचा. तसेच त्याला सेझ द्यावा लागायचा. पण आता शेतकऱ्याला देशात कुठेही, कोणालाही आणि कोणत्याही किमतीत मालाची विक्री करण्याचे अधिकार मिळणार आहे. शिवाय मालाच्या विक्रीवर आठ टक्क्यांचा जो कर द्यावा लागायचा तो देखील द्यावा लागणार नसल्याचे सांगताना मोदी सरकाच्या या क्रांतिकारी निर्णयाचे अभिनंदन करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.
महत्वाचे म्हणजे संसदेत पारित झालेला आणि मोदी सरकारने तयार केलेला कंत्राटी शेती संदर्भातील कायदा २००६ साली महाराष्ट्रात लागू झाला आहे. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. त्याचा फायदाही मोठया प्रमाणावर राज्यातील शेतकऱ्यानं झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तयार झालेला कायदा चांगला आणि देशात मंजूर होत असेल तर तो वाईट हे धोरण म्हणजे बेगडीपणा असल्याचे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाचा आदेश कृष्णकुंजवरून देण्यात आला होता
- यवतमाळच्या डॉक्टरांनी द्यावा खचलेल्या रुग्णांना मानसिक आधार, या मंत्र्यांचे आवाहन
- ‘या’ अंबानगरीत गर्भवती डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू
- जन्मभूमी कर्मभूमीत फोफावलेल्या कोरोनाच्या स्थितीवर रामबाण उपाय शोधणार का फडणवीस ?
- मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर बसून फुकटचे सल्ले देत आहेत ; नवनीत राणांनी केली राष्ट्रपती राजवटची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

